
या सर्व चित्रपट कथांची One line story आणि Synopsis येथे दिले आहे. (पटकथा आणि संवादही तयार आहेत.) ज्या कोणाला या कथा आवडतील आणि त्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करावीशी वाटेल,त्या अनुषंगाने चर्चा करावीशी वाटेल, त्याने कृपया येथे दिलेल्या पत्त्यावर माझ्याशी संपर्क साधावा धन्यवाद!
२
शेवंता जित्ती हाय!
एका चालत्या रेल्वेच्या प्रसाधनगृहात 'शेवंता जित्ती हाय' हे वाक्य वाचून अस्वस्थ झालेला एक संवेदनाशील 'माणूस' 'त्या' शेवंताचा शोध घेण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत, भ्रष्ट शासन-यंत्रणा आणि बधिर समाज-व्यवस्थेशी निकराची झुंज देत शेवंताविषयीचे सत्य नेमके काय आहे ते उजेडात आणतो आणि त्यानिमित्ताने माणसाच्या सद्सद्विवेकबुद्धीचे महत्त्वही जगाला पटवून देतो…
३
सुजाता मेली न्हाय!
मुंबईत एका टॉवरच्या बांधकामावर असणाऱ्या एका मजुराची; सुजाता नावाची आठ वर्षे वयाची मुलगी अचानक नाहीशी होते. शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारी सोशलवर्कर अंजली सुजाताचा शोध घेऊन तिला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करू लागते. त्यासाठी तिला पोलीस-यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांशी कसा संघर्ष करावा लागतो,त्यात ती यशस्वी होते का, सुजाताचे पुढे काय होते,याची रहस्यरंजक, तितकीच प्रेरक, अभूतपूर्व कहाणी!