top of page
अखेर कवितेने गाठलेच...

सुरक्षित सरकारी नोकरीच्या पाशात मी स्वेच्छेने शिरलो होतो; कवितेपासून दूर जाण्याचे हे कदाचित एक कारण असावे. पण असे असले तरी नोकरीतील लेखनातही या ना त्या रूपाने ती शिरकाव करीत आहे असे हळूहळू लक्षात येऊ लागले. जणू माझ्यातून व्यक्त होण्यापासून मी तिला थांबवू शकत नव्हतो. नोकरीत करावे लागणारे क्रिएटिव्ह स्वरूपाचे काम आणि अन्य तत्सम लेखनातून मी अनेकदा काव्यात्म पद्धतीने व्यक्त होत होतो. माझे तसे व्यक्त होणे अनेकांना आवडतही होते. कदाचित त्यातूनच कळत-नकळत माझे आणि माझ्या काव्यजाणिवांचे भरण-पोषण होत असावे! अंतःकरणात धडका मारणारी कविता ही काहीतरी वेगळीच चीज आहे हे विसरता येत नव्हते... 

IMG_1168.PNG
bottom of page