

१
पाण्यातले दिवस
सारे काही त्या गंगामाईलाच ठाऊक आहे असे आई का म्हणायची ते फार उशिरा समजले. तिच्या बोलण्याला एवढा व्यापक अर्थ असेल असे कधी वाटलेच नव्हते. ह्या अर्थप्रत्ययामुळे जाणिवेचा एक नवाच किनारा आता दृष्टिपथात येऊ लागला आहे. माणसाला आपला इतिहास सांगण्यासाठी नदी सदैव आसुसलेली असते, तिच्या काठावरच्या लाटा म्हणजे तिच्या ओठावरचे शब्द असतात हे समजू लागले आहे...
२
बेस कॅम्प ला पोहोचलो तेव्हा तापमान होते वजा तेरा अंश! इतक्या वर्षांचे स्वप्न साकार झाले होते…१७,६९८ फूट उंचीवर चालत पोहोचलो होतो…तेथे एक साक्षात्कार झाला! लेखन वगैरे सगळे दुय्यम, अनुभव घेणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट! आत्मसाक्षात्काराच्या त्या जाणीवेने मन लख्ख उजळून निघाले… आठवण म्हणून तेथून एक छोटा दगड उचलला आणि खिशात टाकला…तो आता माझ्यात लेखनाच्या टेबलावर विराजमान झालेला आहे! मला मिळालेले सर्वोत्तम सन्मानचिन्ह! (पूर्वार्ध पूर्ण. उत् तरार्ध पुढे येत आहे)
ईबीसी आठवणी

३
एकदा तुम्ही हिमालयात गेलात की तेथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. हिमालयातील गिर्यारोहणाची गोडी असेल तर वर्षातून एकदातरी तेथे जाऊन यावेसे वाटतेच! एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाण्यापूर्वी आम्हाला उत्तराखंडातील बागिनी ग्लेशियर्स या ट्रेकला जाण्याची संधी मिळाली होती. त्या आठवणी तुमच्यासाठी येथे देत आहे. आणि हो हिमालयातील आमच्या भ्रमंती संबंधी सविस्तर वाचायचे असेल तर ग्रंथालीने माझे ‘हिमाक्षरे’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे; ते अवश्य वाचावे!
'बागिनी ग्लेशियर्स' उत्तराखंड!

४
तांबट
Coppersmith Barbet अर्थात् तांबट हा पक्षी जगभर Garden Bird म्हणून ओळखला जातो. या पक्ष्याचे जीवनचक्र जवळून पाहण्याची संधी लेखकाला मिळाली आणि त्यातून तांबट या पुस्तकाचा जन्म झाला. हे पुस्तक ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले असून विक्रीसाठी उपलब्ध आहे. निसर्गप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन पंखावरून भरारत लेखकाने एका पक्ष्याचा सृजनसोहळा अतिशय लालित्यपूर्ण पद्धतीने वैश्विक पातळीवर नेऊन ठेवला आहे. मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार शांताराम अर्थात के.ज. पुरोहित यांनी हे पुस्तक वाचल्यावर लेखकाला पत्र पाठवून “ज्ञान आणि आनंद देणाऱ्या तुमच्या लेखणीला नमस्कार” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रसिद्ध ‘ॲड गुरु’ गोपी कुकडे यांनी केलेली या पुस्तकातील रेखाटनेही आणि अर्थातच मुखपृष्ठही अप्रतीम झाले आहे.